महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – गणेशोत्सवानिमित्त येथील महाबळेश्वर प्रेमी ग्रुपने आयोजित केलेली कराओके स्पर्धा येथील हॉटेल जेस् एक्सलंन्सी येथे उत्साहात पार पाडली.
“व्हॉइस ऑफ महाबळेश्वर” कराओके स्पर्धा – याचे दुसरे पर्व एकूण तीन वयोगटामध्ये घेण्यात आले. १२ वर्षांखालील, १२ ते २० वर्ष व २० वर्षापुढील अशा तीन वयोगटात एकूण ५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
१२ वर्षांखालील वयोगटात- संस्कृती आखाडे, आदिनाथ ढेबे व प्रतीक काळे, १२ ते २० वयोगटात- श्रुती पार्टे, अर्पिता जोशी, आदिती बोडस व श्रद्धा सपकाळ तसेच २० वर्षां पुढील वयोगटात – मेलवीन, सागर चव्हाण,
निलेश जोशी व अश्विनी शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण सागर वैराट,विजय कांबळे व डॉ. लंबाडे यांनी केले. संपूर्ण दिवस गणरायाच्या साक्षीने संगीताची सुरेख अशी मैफिल रंगली होती.
महाबळेश्वर प्रेमी ग्रुपने आतापर्यंत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,रक्तदान शिबीर, कराओके स्पर्धा, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धा, जागर पुस्तकांचा, विविध शालोपयोगी वस्तूंचे वाटप,
वृक्षारोपण,सीड बॉल उपक्रम,वेण्णा लेक येथे स्वच्छता मोहीम,शालेय विद्यार्थ्यांचा जंगल ट्रेक,महिला दिना निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप असे उपक्रम राबवले आहेत.