अभिनेता करण ओबेरॉयला हायकोर्टाचा दिलासा

50 हजारांच्या जामीनावर सुटका

मुंबई – महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला टिव्ही अभिनेता करण ओबेरॉयला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने करणची 50 हजार रुपयांच्या वैयक्तीक जामिनावर सर्शत सुटका केली. तपास अधिकारी आणि न्यायालय बोलवेल त्यावेळी हजर राहण्याचे आदेश दिले. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या आणि “जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून एक स्वतंत्र ओळख मिळवलेला अभिनेता करण ओबेरॉयची 2016मध्ये टिंडर या डेटींग ऍपवरून एका ज्योतिषी महिलेबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.

यावेळी तिने त्याला टाईमपास रिलेशन ठेवण्यास रस नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर ते दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांच्या संपर्कात होते. जानेवारी 2017 रोजी तो तिच्या घरी असताना त्याने तिला नारळ पाण्यातून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडिओ काढले होते. तसेच तो तिला ब्लॅकमेल करु लागला.

यानंतरच पीडित महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत करणला 5 मे रोजी अटक केली होती. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.