बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात करण जोहरची होणार चौकशी ?

मुंबई –  सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्यानंतर बॉलीवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींना ट्रोल केले जात आहे. यात पहिले नाव करण जोहरचे आहे. चाहत्यांना असे वाटते की, सुशांतचा नेपोटिझने बळी घेतला असून यासाठी करण जोहर जबाबदार आहे. यामुळे सोशल मीडियावर करणला ट्रोल करण्यात येत आहे.

यातच आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडियो बाबत टीका केली जात आहे.


शिरोमणी अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंह सिरसा आणि महाराष्ट्राचने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही करण जोहरच्या पार्टीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तत्पूर्वी  मंजिंदर सिंह सिरसा यांनी हा व्हिडियो शेअर  होता हा व्हिडियो गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ करण जोहरच्या पार्टीचा होता. या पार्टीत दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन, अयान मुखर्जी, रणबीर कपूर यांच्यासह इतरही अनेक लोक दिसून आले होते. हा व्हिडीओ स्वतः करण जोहरने शूट केला होता. गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज पार्टी करत असल्याचं बोललं जात होते. याच व्हिडियोला अनुसरून करण जोहरच्या पार्टीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.