मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ‘ब्रम्हास्त्र त्याच्या बजेटमुळे चांगलाच चर्चेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला असला तरी या चित्रपटाची चर्चा मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. नुकतंच एका अभिनेत्याने ब्रम्हास्त्रच्या निर्मात्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ब्रम्हास्त्रचा निर्माता करण जोहर या चित्रपटनानंतर आत्महत्या करणार होता असा दावा या अभिनेत्याने केला आहे.
अभिनेता कमल आर खान उर्फ केआरके हा नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतो. नुकतच त्याने ब्रम्हास्त्रबाबत एक खुलासा करत करण जोहर विषयी एक ट्विट केले आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो,”सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी करण जोहरने ब्रह्मास्त्रच्या मोठ्या नुकसानीमुळे आत्महत्येसाठी त्याच्या घरी ड्रामा केला होता.त्यानंतर मुकेश अंबानींनी त्यांना त्याला 300 कोटींचे कर्ज दिले. आता प्रश्न हा आहे की, करण जगाला स्पष्टपणे का सांगत नाही की तो ब्रम्हास्त्रमुळे दिवाळखोर झाला होता”.
According to sources, Sometimes ago, Karan Johar made a drama at his home for suicide coz of huge loss of #Brahmastra! Then Mukesh Ambani gave him ₹300Cr loan. Now Question is this, why Karan doesn’t tell to world clearly that he has become bankrupt coz of disaster #Brahmastra
— KRK (@kamaalrkhan) December 2, 2022
याआधी देखील केआरकेने ब्रम्हास्त्र चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले होते. ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या कमाईचे खोटे आकडे मीडियाने समोर आणल्याचे त्याने म्हंटले होते. केआरके सतत कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत असतो. आता त्याचे हे विधान नेहमीप्रमाणे वाटत असले तरी यात उद्योगपती अंबानींचे नाव आल्याने याबाबतच्या विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.