करण देओल पडला प्रेमामध्ये

सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. दिसण्यावरून तो आपल्या वडिलांसारखाच आहे आणि वडिलांच्या स्वभावातला लाजाळूपणाही त्याच्यात आहे.

धर्मेंद्र आणि सनी दोघेही ऍक्‍शन हिरो म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र करणला पहिल्यापासून रोमॅण्टिक हिरोचा रोल निभावा लागणार आहे. त्याच्या चॉकलेट हिरोच्या इमेजला हाच रोल साजेसा आहे. “पल पल दिल के पास’ मधून करणला लॉंच करण्याची आयडिया पुढे आली ती या इमेजमुळेच. या सिनेमात ऍक्‍शनही आहे मात्र तो सिनेमाचा उत्तरार्ध असणार आहे. पण रोमान्स हा सिनेमाचा मुख्य विषय असेल,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्याच सिनेमापूर्वी करणने “आपण प्रेमात पडल्याचं जाहीर करून टाकलं आहे. त्याच्याकडून त्याच्या गर्लफ्रेंड बाबत अजून बरीच माहिती काढून घ्यायची आहे. पण रोमॅन्टिक हिरोच्या रोलला साजेसा आपल्या लुकच्याच प्रेमात आपण पडलो असल्याचे त्यानेच सांगितले.

पहिला सिनेमा अजून रिलीज व्हायचा असला तरी करणकडे आणखीन सिनेमे यायला लागले असल्याचे समजते. दुसरा सिनेमा अर्थातच कॉमेडी असेल असे त्याने सांगितले.

आपल्या मुलाच्या पहिल्या सिनेमाचे डायरेक्‍शन सनी देओलने स्वतः केले आहे. हिमाचल प्रदेशात या रोमॅंटिक सिनेमाचे शूटिंग झाले आहे. निरागसपणा, शंका, भावनिक गुंतागुंत असे अनेक पैलू करणला “पल पल दिल के पास’ मधून दाखवावे लागणार आहेत. करण स्वतः उत्तम डान्सर आहे. हे त्याने अलीकडेच एका प्रमोशनच्या वेळी दाखवून दिले. एका डान्स रिऍलिटी शोच्या सेटवर करीना कपूरने करणच्या डान्सिंग स्कीलचे कौतुक केले. करण बरोबरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असणाऱ्या सहर या ऍक्‍ट्रेसचाही “पल पल दिल के पास’ हा पहिला सिनेमा आहे. मात्र “सेंटर ऑफ ऍट्रॅक्‍शन’ सहरपेक्षा करण देओल असणार यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)