Nitesh Karale । नुकतेच मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी तेथे शरद पवार गटाचे रोहित पवार तसेच ‘खदखद’ कराळे गुरुजी म्हणून संपूर्ण देशात ओळख मिळालेले वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे देखील उपस्थित होते. यावेळी कराळे गुरुजींनी मोदी सरकारच्या नेत्यांवर सडकून टीका केली.
त्यांचे सोशल मीडियावर खात्यावर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना आपल्या अनोख्या शैलीत शिकवतांनाचे व्हिडिओ व्हायरल होतात. तसेच ते व्हिडीओच्या माध्यमांतून मोदी सरकारवर टीका करतांना दिसतात. अशात त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नितेश कराळे म्हणाले,’ट्रम्प जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या पत्नीने दिल्लीतील शाळा बघण्याचा आग्रह धरला होता. पण दाढीवाल्या बापूने (मोदींनी) त्यांना म्हटलं की दुसऱ्या शाळा पाहू. पण, ट्रम्प यांच्या पत्नीने आग्रह धरल्याने दिल्लीच्या शाळा दाखवल्या. त्यांनी पण आश्चर्य व्यक्त केलं होतं. भारतातील विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ राहा, नाहीतर भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात आणि तिथे लिंबू मिरच्या लावतात.’ असं म्हणत त्यांनी बोचरी टीका केली.
ते पुढे म्हणाले की, ‘रोहित पवारांच्या रूपाने या मतदारसंघाला तीन आमदार मिळाले आहे. स्वतः रोहित पवार, त्यांचे वडील आणि त्यांच्या मातोश्री. रोहित पवारांचे आई-वडील देखील 24 तास या मतदारसंघासाठी काम करत आहेत, असे कौतुक त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्या कुटुंबियांचे केले.