जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६२० वर…
सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दोन जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती शनिवारी रात्री उशिरा मिळाली. सकाळी १९ पाँझिटिव्ह आले होते. दिवसभरात २१ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ६२० झाली आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या १६ नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील ६५ वर्षीय महिला व केसे येथील ३२ वर्षीय महिला या दोन महिलांचे करोनारिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर उर्वरित १४ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी रात्री साडेनऊ वाजता दिली.
वाई तालुक्यातील पसरणी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या ७५ वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.
२११ जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला…
वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील १३, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील ८०, खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील ४५, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील ३२ व रायगाव येथील ४१ अशा २११ संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या एन. सी. सी. एस. येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.