कराडात उद्या ऍड. आंबेडकर, ओवेसींची सभा

कराड  – सातारा लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असुदुद्दीन ओवेसी यांची रविवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता जनता व्यासपीठावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ऍड. संभाजीराव मोहिते, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खंडाईत म्हणाले, देशात संविधान बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून दडपशाही सुरू आहे. बहुजन समाजाचे स्वातंत्र्य आणि देशातील लोकशाही धोक्‍यात आली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी राज्यात लोकसभेच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढत आहे. जिल्ह्यातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देऊन प्रचार यंत्रणा राबविली आहे. आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर आणि खा. ओवेसी यांची रविवारी सकाळी जनता व्यासपीठावर जाहीर सभा होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.