Karad News : कराड येथील (Karad News) छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी छापा टाकून 2 लाखांचा 8 किलो गांजा जप्त केला. जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत कराड उपविभागीय पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. गांजा विक्री प्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदारावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Karad News) दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. परवीन इब्राहिम पटेल (रा. इदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी) व तिचा साथीदार संदीप सतीश पाटील, (वय 37 रा. सुपने ता. कराड) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी तक्रार दिली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कराड (Karad News) शहरातील इदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी, शनिवार पेठ येथे परवीन पटेल व तिचा साथीदार संदीप पाटील हे दोघे गांजा विक्री करत आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दि. २३ मे रोजी मिळाली. Karad News त्यानुसार राजश्री पाटील यांच्या आदेशाने सपोनि निलेश तारू यांच्या अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कराड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शनिवारी शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात छापा टाकला. या कारवाईत 8.050 किलो वजनाचा 2 लाख 1 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, स्वप्नील साबळे, मयुर देशमुख, मारुती लाटणे व महिला पोलीस कॉन्स्टेबल सरिता मोहिते यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.