कराड पालिकेच्या शाळा क्र. 9 मध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत

कराड – कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 9 येथे शाळेच्या प्रथम दिनी नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवीन गणवेश, बूट, दप्तर घेऊन बालगोपाळांनी आई-बाबा, आजी-आजोबा यांचे बोट धरुन शाळेचा उंबरा ओलांडला आणि सजलेल्या शाळेचे वर्ग या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गजबजून गेले. नवागतांचे मान्यवरांनी गुलाबपुष्प व खाऊ देवून स्वागत केले. समारंभपूर्वक त्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

प्रवेशोत्सवासाठी शाळा सजविण्यात आली होती. देशभक्तीपर गीते, सनई लावून शालेय वातावरण मंगलमय, प्रसन्न करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी आंतरराष्ट्रीय नाविण्यपूर्ण गणित, विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन नगरसेविका अरुणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य समिती सभापती गजेंद्र कांबळे, सुरेश पाटील, इलाही मुल्ला आदी मान्यवर व पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापक अरविंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ. अर्चना मुंढेकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. अंजली कदम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. भारती पवार, सौ. ज्योती किर्तीकुडवे, सौ. निलिमा पाटील, सौ. लक्ष्मी पवार, रेश्‍मा मालवदे, सौ. अनिता गुजे, शुक्राचार्य चोले, अजित केंद्रे, दिगंबर थेटे, श्रीपाद हेळंबकर यांनी विशेष केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.