कराड – कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांकडून शपथपत्र दिले जाते. त्या शपथपत्रामध्ये मालमत्तेची आणि दाखल असलेल्या गुन्ह्यांसंबंधीच्या नोंदी असतात.
कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभेसाठी दोन दिवसात दाखल झालेल्या तीन व्यक्तींच्या मालमत्तेमध्ये कराड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची 12 कोटी 58 लाख रुपयांची मालमत्ता तर प्रतिस्पर्धी डॉ. अतुल भोसले यांनी 9 कोटी 68 लाख रुपयांची मालमत्ता तसेच कराड उत्तरचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी 15 कोटी 69 लाख रुपयांची मालमत्ता आपल्या नामनिर्देशन पत्रात जाहीर केली आहे.
डॉ. अतुल भोसले यांच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नाही मात्र त्यांच्या पत्नी यांच्या नावावर जॉग्वॉर ही गाडी आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्रात दिलेल्या माहितीनुसार ना. डॉ. अतुल भोसले यांच्याकडे रोख रक्कम 51 हजार 850 आहे. बॅंक खात्यातील ठेवी 45 लाख 58 हजार 499 रुपये, शेअर्स व फंड गुंतवणूक 1 कोटी 53 लाख 86 हजार 696, पोस्ट, विवरण पत्रे, राष्ट्रीय बचत योजने 17 लाख 20 हजार 247 रुपये, सोन्यातील गुंतवणुकीमध्ये 5 लाख 39 हजार रुपये किंमतीचे दागिने आहेत.
डॉ. भोसले यांची वैयक्तिक मालमत्ता 2 कोटी 73 लाख 62 हजार 292 इतकी आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे 54 कोटी 62 लाख 41 हजार 577 रुपयाची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे त्यांचे नावे एकही चार चाकी वाहन नाही. मात्र त्यांच्या पत्नी गौरवी भोसले यांच्या नावावर 99 लाखांची जॅग्वॉर कार आहे. तर 26 लाख 23 हजार 138 रुपयांचे सोन्याची गुंतवणूक आहे. तर पत्नी गौरवी भोसले यांचे नावे बॅंक, सोने व इतर गुंतवणूक 54 कोटी 62 लाख 41 हजार 577, स्थावर व जंगम मालमत्ता 5 कोटी 70 लाख 39 हजार 260 रुपये अशी एकूण 60 कोटी 32 लाख 80 हजार 837 रुपये आहे. दोघांवर कोणताही गुन्हा दाखल नाही.
निवडणूक नामनिर्मेदशन पत्रात दिलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे रोख रक्कम 8 लाख रुपये आहेत. बॅंक खात्यातील ठेवी स्टेट बॅंकेमध्ये 51 लाख 50 हजार 631 रुपये, दिल्ली येथील आयसीआयसी बॅंक 13 लाख 95 हजार 798, नोयडा आयसीआयस बॅंक 4 लाख 46 हजार 953 रुपये, कराड येथील स्टेट बॅंकेत 17 लाख 78 हजार 827 रुपये, पार्लेमेंट हाऊस एसबीआय बॅंक 18 लाख 2 हजार 596, परकीय चलन 6 लाख 22 हजार 446 रुपये, आयसीआय बॅंक कराड 2500 रुपये आहेत.
शेअर्स व फंड गुंतवणुक एसबीआय 11 लाख 74 हजार 890 रुपये, आयसीआय 50 लाख, रिलायन्स म्युचअल फंड 10 लाख, आयसीआय 90 लाख. पोस्टल सेव्हींग, इन्शुरन्स पॉलिसी नॅशनल सेव्हींग स्किम 4 लाख 21 हजार 944 रुपये, एलआयसी पॉलिसी 2 लाख 21 हजार 800 किंमतीची एलआयसी पॉलिसी, नॅशनल स्पॉअ एक्सेनशन 4 लाख 41 हजार 778 रुपये, वाहने फॉच्युअरन एसयुव्ही 10 लाख, सोने दागिन 250 ग्रॅम सोने 7 लाख 91 हजार, चांदी दागिने 11.50 किलो 4 लाख 28 हजार 318 इतर उत्पन्न 1 लाख 7 हजार 905 रुपये तर त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांचे नावे 4 लाखाची रोख रक्कम, बॅंक ऑफ इंडीया मिरज येथे 54 लाख 13 हजार 127, कराड अबॅंन बॅंकेत 2 लाखाची एफडी आहे. नवी दिल्ली खान मार्केट बॅंक ऑफ इंडिया शाखेत 1 लाख 30 हजार 304, आयसीआयसी बॅंक नवी दिल्ली 8 लाख 166, बॅंक ऑफ इंडिया वाळकेश्वर 15 लाख 27 हजार 270 रुपये, कराड अर्बन सोसायटी को-ऑप बॅंक 1 लाख 25 हजार 899, आयसीआयसी बॅंक 10 लाख 10 हजार726 एफडीआर आहे.
शेअर्स व फंड आयडीबीआय बॅंक 7 हजार 936 किंमतीचे 170 शेअर्स, बॅंक ऑफ बडोदा 12 हजार 880 रुपयांचे 100 शेअर्स आहेत. पत्नीच्या नावे एलआयसी पॉलिसी 9 लाख 90 हजार रुपये, पत्नीच्या नावे होंडा सिटी 3 लाख रुपये, सोने 950 ग्रॅम सोने 30 लाख 5 हजार 800 इतर उत्पन्न 18 लाख 6 हजार 732 रुपये आहेत. तर पत्नी सत्वशीला चव्हाण यांचे नावे बॅंक, सोने व इतर गुंतवणूक 1 कोटी 40 लाख 10 हजार 840 रुपये, स्थावर व जंगम मालमत्ता 2 कोटी 65 लाख 70 हजार असे एकूण 4 कोटी 5 लाख 80 हजार 840 रुपये आहेत. यांचे नावे युनियन बॅंकेकडून शेती पाईपलाईनसाठी 5 लाख 67 हजार 650 रुपये कर्ज काढल्याची नोंद आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
कराड उत्तरचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2019 मध्ये 15 कोटी 69 लाख, 2014 मध्ये 7 कोटी 15 लाख, जंगम 13 कोटी 47 लाख 9 हजार 966 रुपये, स्थावर संपत्ती 2 कोटी 22 लाख 62 हजार 528 रुपये, कर्ज 4 लाख 21 हजार 401 रुपये, वाहने फॉरचुनर, सोने चांदी 845 ग्रॅम असे नमूद केले असून यांचेवर गुन्हा दाखल नाही. असे म्हटले आहे. एकंदरीतच दोन दिवसात इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरुन कोणाकडे किती मालमत्ता आहे. तर कोणावर किती गुन्हे आहेत. हे जनतेला कळणार आहे.