हिंदी टेलिव्हिजनवरील ‘काॅमेडियन किंग’ अशी ओळख असणारा कपिल शर्माने चाहत्यांसाठी एक खुशखबर घेऊन आला आहे. कॉमेडियन कपिल शर्माची कॉमेडी आता हॉलीवूडलाही हसवणार आहे. नुकतेच स्वतः कपिल शर्माने याबाबतची घोषणा केली आहे. आपल्या सिनेमाचे पहिले पोस्टरही त्याने रिलीज केले आहे. यामुळे त्याच्या फॅन्सना आनंदाचा धक्काच बसला आहे.
भारतात अँग्री बर्ड या अॅनिमेटेड चित्रपटाला दर्शकांनी चांगली पसंती दिली होती. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील रेड अँग्री बर्डला आवाज देण्यासाठी कपिल शर्माची निवड करण्यात आली आहे. अँग्री बर्ड चित्रपट भारतात २३ ऑगस्ट रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू प्रदर्शित होणार आहे.