कपिलदेव यांची समिती प्रशिक्षक निवडणार

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्याचे अधिकार 1983 मध्ये विश्‍वचषक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार व समालोचक कपिलदेव यांच्या क्रिकेट सल्लागार समितीकडे देण्यात आले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या व्यवस्थापन समितीच्या (सीओए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीचे मुख्य विनोद राय यांनी ही माहिती दिली. कपिलदेव यांच्या समितीत भारताच्या महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. प्रशिक्षकपदासाठी रीतसर अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रशिक्षकपदासाठी ऑगस्टमध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडेच आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहणार आहे. हा दौरा सप्टेंबरमध्ये संपणार असून त्यानंतर नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. शास्त्री यांनाही पुन्हा या पदासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)