मुंबई – सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट लाल सलाम सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे लेक ऐश्वर्या रजनीकांत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. काही वेळापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली होती. पण आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे.
थलैवा या नावाने प्रसिद्ध असलेल्या रजनीकांतच्या या चित्रपटात तुम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव देखील स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. स्वत: रजनीकांत यांनी याबाबत ट्विट केले आहे. कपिल देवसोबतचा तिचा एक फोटोही शेअर केला आहे.
रजनीकांतने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटोमध्ये, क्रिकेटरने रजनीकांत यांच्या आगामी ‘लाल सलाम’ चित्रपटाच्या सेटला भेट दिली आहे. फोटो शेअर करताना रजनीकांतने लिहिले की, ‘महान, सर्वात आदरणीय आणि अद्भुत व्यक्ती, कपिलदेवजी यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी सन्मान आणि विशेषाधिकार आहे, ज्यांनी पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकून भारताचा गौरव केला.’
‘लाल सलाम’ चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो असे मानले जात आहे. चित्रपटात रजनीकांतशिवाय विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. ए आर रहमान या चित्रपटाला संगीत देणार आहे.