-->

प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बंगळुरू – कन्नड अभिनेत्री आणि बिग बाॅस कन्नडची कंटेस्टेंट असलेल्या जयश्री रमैया हिने आज (सोमवारी) आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह बंगळुरू मधील आश्रमात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे याचा पोलिस तपास करत आहेत.

जयश्री रमैया

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. बंगळुरू येथील संध्या किरण आश्रमात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर पोस्ट लिहून जीवन संपवत असल्याचे सांगितले होते. त्यांनी व्हीडीओद्वारेही सांगितले होते की त्या डिप्रेशन मधून बाहेर येत नाहीए त्यामुळे जीवन संपवू इच्छीत आहे. मात्र, काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलिट देखील केली होती.

जयश्री रमैया

जयश्री रमैया एक प्रसिद्ध माॅडल आणि डांसर होती. 2015 मध्ये त्यांचा कन्नड बिग बाॅस मध्ये सहभाग होता. Uppu Huli Khara हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.