बेंगळूर -कन्नड अभिनेता सुशील गौड याने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येला एक महिनाही पूर्ण झालेला नसताना आता कन्नड अभिनेत्याच्या आत्महत्येने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अंथपुरा या प्रसिद्ध मालिकेतील अभिनयाच्या जोरावर सुशील खूप कमी काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. कर्नाटकमधील चरवपूर या त्याच्या मूळ गावी त्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. सुशील केवळ 30 वर्षांचा होता. त्याने सुसाइड नोट लिहून ठेवलेली नाही त्यामुळे त्याला कसले दडपण होते, असा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.