नवी दिल्ली- मला कोविड-19 म्हणजेच कोरोनाच्या वाॅर्डमध्ये तैनात करा, अशी विनंती एम्सच्या नर्सिंग ऑफिसर कनिष्क यादव यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी प्रशासनाला एक पत्र लिहीलं आह. त्यात ही मागणी केली आहे.
मला ट्रामा सेंटरच्या कोविड-19 च्या म्हणजेच कोरोनाबाधितांच्या वार्डमध्ये डेप्युटी करा, ही सगळी आपात्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मी सक्षम आहे, असा विश्वासही त्यांंनी दर्शवला आहे.
दरम्यान, इथे कोरोनाच्या वार्डमध्ये जाण्यासाठी सगळे मन एकवटत आहे. मात्र यांनी त्या वार्डमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करण्याची इच्छा दर्शवली आहे.
भारतात कोरोनाबधितांची संख्या दोन हजारावर गेली आहे आणि तर 41 जणांचा मृत्यु झाला आहे. त्या निडामुद्दीनमध्ये गेलेल्या 1400 पैकी 1300 जणांचा शोध घेण्यात आला आहे.