कंगनाची उडी परमवीर सिंग आणि गृहमंत्री देशमुख वादात

साधूंची हत्त्या आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचे पतन निश्‍चित असते

मुंबई – राज्याचे गृहमंत्री पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून खंडणीपोटी कोट्यावधी रुपये उकळत होते, या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विधानानंतर राज्यासह देशात खळबळ उडालेली आहे. परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक झाल्यानंतर दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याच्या विधानामुळे विद्यमान राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा गेला असून आता सरकारमधील नेते डॅमेज कंट्रोलसाठी सरसावले आहेत.

मात्र, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कंगनाने एक वादग्रस्त ट्‌वीट करत पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाय या ट्‌वीटमध्ये तिने परमवीर सिंग, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत यांना टॅग केले आहे.

कंगनाने म्हटले आहे की, जे लोक साधूंची हत्त्या करतात आणि स्त्रियांचा अपमान करतात, त्यांचे पतन निश्‍चित असते. कंगनाचा रोख राज्य सरकारने तिचे कार्यालय अनधिकृत ठरवून पाडल्याच्या घटनेकडे आहेच. शिवाय पालघरमधील साधूंच्या हत्त्याकांडात महाराष्ट्र पोलिसांनी बजावलेल्या बघ्याच्या भूमिकेकडेही आहे.

आपला राग व्यक्त करताना थोडक्‍यात कंगनाने प्रत्यकाला करावे तसे भरावे लागते, हाच संदेश दिल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.