कंगनाच्या टिव टिवला ट्विटरचा दणका; अकाऊंट केलं कायमस्वरुपी बंद

मुंबई –   बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे.आताही अशाच एका घटनेवरून कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद  केले आहे.  पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.

देशातील संपूर्ण राजकीय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसने एक हाती वर्चस्व राखले आहे. मात्र बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ममता बॅनर्जी  यांच्या बाबत कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केले, यामुळे कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिने ट्विट केले आहे की,’ ‘मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही रक्ताची भुकेली राक्षसीण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.’ याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.

यावरून , या ट्विटबाबत  कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना अॅडव्होकेट सुमित चौधरी यांनी ईमेलद्वारे तक्रार पाठवली होती. त्यांच्या या तक्रारीत त्यांनी सांगितले की कंगनाच्या वक्तव्यांमुळे बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांचा अपमान केला आहे.

एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीएमसी पक्षाने विजय मिळवल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.