कंगनाची पुन्हा जीभ घसरली म्हणाली,’ममता बॅनर्जी रक्ताची भुकेली राक्षसीणच’

मुंबई –  देशातील संपूर्ण राजकीय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसने एक हाती वर्चस्व राखले आहे.

 

मोठ्या विजयाची अपेक्षा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मात्र मोठा अपेक्षा भंग झाला आहे. भाजपने सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये जितके यश मिळवले होते तेवढे यशही राखणे या पक्षाला यावेळी जमले नाही. सध्या सोशलवर याच मुद्यावरून ममता बॅनर्जी यांचे  युजर्स द्वारे त्यांचे अभिनंदन तर  भाजप कट्टर सार्थकांकडून त्यांच्यावर टीका केली आहे.

यातच नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने याच मुद्यावर कंगनाने ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जींची तुलना त्राटिका या राक्षसीसोबत केली. त्यामुळे सध्या ती पुन्हा ट्रोल होत आहे.

तिने ट्विट केले आहे की,’ ‘मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही रक्ताची भुकेली राक्षसीण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.’ याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.

या ट्विट्समुळे कंगना जबरदस्त ट्रोल होतेय. लोकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कंगनाला मेंटल, पागल म्हटले आहे तर काहींनी ती हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. अनेकांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणीही केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.