करोनाच्या साथीमुळे कंगनाचा “थलायवी’पुढे ढकलला

कंगनाचा “थालयवी’ बघण्यासाठी प्रेक्षकांनी आतापर्यंत खूप वाट बघितली आहे. मात्र आता प्रेक्षकांना हा सिनेमा बघण्यासाठी आणखीन वाट बघावी लागण्याची शक्‍यता आहे. 

देशभर करोनामुळे कठोर निर्बंध लागू आहेत केले आहेत. वर्षभर लॉकडाऊन सारखी परिस्थिती होती. त्यामुळेच गेल्या वर्षी “थलायवी’ रिलीज होऊ शकला नाही.

या वर्षीही या स्थितीमध्ये विशेष बदल न झाल्यामुळे “थलायवी’ या सिनेमाचा रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. फक्त “थलायवी’नव्हे तर अक्षय कुमारचा “सूर्यवंशी’, अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्‍मी यांचा “चेहरे’ या सिनेमांचे रिलीजही लांबणीवर पडले आहेत.

“थलायवी’हा कंगना राणावतचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधांचे पालन करून, योग्यवेळी प्रेक्षकांसमोर “थलायवी’आणला जाईल असे निर्मात्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.