बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने गतवर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. त्यावेळी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर कंगनाने हृतिकवर आरोप लावल्याने बॉलिवूडमध्ये मोठे वादंग देखील उठले होते.
Duniya kahan se kahan pahunch gayi magar mera silly ex abhi bhi waheen hai usi modh pe jahan yeh waqt dobara laut ke nahi jane wala … 🙂 https://t.co/wEMxFCBK3n
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 26, 2021
दरम्यान , तिचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २०१४ पासून वाद सुरू झाला असून ई मेल आयडी बनावट असल्याचा दावा कंगनाने केला असून या वादावरून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला होता. यातच पुन्हा एकदा कंगणाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे की,’जग कुठून कुठे पोहचलं, तरी माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून तिथेच आहे. त्याच वळणावर आहे, ती पुन्हा फिरून येणार नाही, असं कंगणाने म्हटलंय. यावरून कंगणा आणि हृतिक यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच पाहायला मिळणार अशी शक्यता निर्माण झाली होती.