मुंबई – बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे वैवाहिक जीवन सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलियाने सांगितले की, नवाजुद्दीनने तिला आणि त्यांच्या मुलांना घरातून हाकलून दिले आहे. आता या अभिनेत्याने पत्नीच्या आरोपांवर मौन सोडले आहे.
पत्नी आलियाच्या आरोपांना कंटाळून नवाजुद्दीन सिद्दीकीने अखेर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक भली मोठी पोस्ट लिहीत अभिनेत्यानं यावर आपली प्रतिक्रया दिली आहे. तसेच, त्याने आलियाचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Silence doesn’t always give us peace, @Nawazuddin_S saab, there are many fans and well wishers of yours who care to know your side of the story 🙏 https://t.co/yEwuHXmHCH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 6, 2023
दरम्यान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या या पोस्टला आता बॉलिवूडची पंगा क्वीन म्हजेच, अभिनेत्री कंगना राणावतने रिप्लाय दिला आहे. ट्विटच्या माध्यमातून तिने हा रिप्ले दिला असून कंगना म्हणाली की.., ‘मौन हे तुम्हाला शांती देत नाही. नवाजुद्दीन साहेब, तुमचे चाहते आणि हितचिंतक यांना तुमची बाजू ऐकायची होती.’ कंगनाच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
नवाजुद्दीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले,’माझ्या मौनामुळे मला वाईट व्यक्तीचा टॅग देण्यात आला आहे. हा तमाशा टाळण्यासाठी मी गप्प बसलो होतो, कारण या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना आज ना उद्या वाचायला मिळतील. माझ्या चारित्र्यावर खोट्या आणि एकतर्फी व्हिडिओंद्वारे हत्या केली जात आहे, ज्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि अनेक लोक आनंद घेत आहेत. पण मला काही गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो…’
1. ‘सर्व प्रथम, आलिया आणि मी अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आमची परस्पर समज फक्त मुलांसाठी होती.’
2. ‘माझी मुलं भारतात का आहेत आणि गेल्या ४५ दिवसांपासून शाळेत का जात नाहीत हे कोणाला माहीत आहे का? शाळा मला पत्रे पाठवत आहे की सुट्टी खूप झाली आहे. माझ्या मुलांना 45 दिवसांपासून बांधून ठेवण्यात आले आहे. माझ्या मुलांना दुबईतील त्याच्या शाळेत जाता येत नाही.’
नवाजुद्दीन आलियाला लाखो रुपये देतो
नवाजुद्दीन सिद्दीकीनेही आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, आलियाला गेल्या 2 वर्षांपासून दरमहा 10 लाख रुपये दिले जात आहेत. त्याच वेळी, मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी आलियाला दरमहा 5-7 लाख रुपये दिले जात होते. मुलांच्या शाळेची फी, वैद्यकीय आणि प्रवासाचा खर्च वेगळा दिला जातो.
मुलांसाठी भव्य घर दिले
नवाजुद्दीनने सांगितले की,’त्याने पत्नीची कमाई सेट करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. आलियाला आलिशान वाहने देण्यात आली होती, मात्र तिने ती वाहने विकून पैसे स्वत:साठी खर्च केले. नवाजुद्दीनने सांगितले की, त्याने मुलांसाठी मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंटही दिले आहे. मुले लहान असल्याने आलियाला घराची मालकीण करण्यात आली. नवाजुद्दीनने असेही सांगितले की त्याने आपल्या मुलांसाठी दुबईमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आहे, जिथे आलिया देखील विलासी जीवन जगते.’
पैशासाठी आलियाला बदनाम करत आहे ?
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे की, ती पैशासाठी हे सर्व करत आहे. नवाजुद्दीनच्या म्हणण्यानुसार, आलिया पैसे हडपण्यासाठी त्याच्यावर अनेक आरोप करत आहे. पत्नीच्या घरातून बाहेर काढल्याच्या आरोपावर अभिनेता म्हणाला,’माझी मुलं जेव्हा सुट्टीच्या दिवशी भारतात येतात तेव्हा आजीसोबत राहतात. त्यांना कोणी घरातून कसे बाहेर काढू शकते. घरातून बाहेर काढताना तिने व्हिडिओ का बनवला नाही, जर ती प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवते. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.’