‘जल्लीकट्टू’ चित्रपटावरून कंगनाचा बॉलिवूड माफियांवर हल्ला, म्हणाली…

मुंबई – ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे जलिकट्टु या चित्रपटाला अधिकृतपणे नामांकन देण्यात आले आहे. 93 व्या अकादमी पुरस्कारासाठी फिचर फिल्म गटात भारताची ही अधिकृत एन्ट्री असणार आहे. लिजो जोस पेलीसेरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. या फेडरेशन कडे ऑस्करमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून एकूण 27 चित्रपट दाखल झाले होते.

दरम्यान, ही बातमी व्हायरल होताच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट करत पुन्हा बॉलिवूडवर टीका केली आहे. ‘चित्रपट माफिया टोळी त्यांच्या घरात लपून बसली असल्याने, ज्यूरीला त्यांचे काम करण्याची मुभा मिळाली आहे. खूप चांगले. हे असेच झाले पाहिजे… जल्लीकट्टूच्या टीमचे अभिनंदन! असे कंगनाने म्हटले आहे.

मल्याळी भाषेतील ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट 4 ऑक्टोबर 2019 मध्ये केरळ राज्यात रिलीज झाला होता. ‘जल्लीकट्टू’ हा केरळचा एक पारंपरिक खेळ आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील ‘जल्लीकट्टू’ या वादग्रस्त खेळावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते. आणि त्यानंतर बैलाला पडण्यामागचे प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.