कंगनाला ‘पप्पू’ ट्वीट भोवणार

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींना मुंबई पोलिसांनी बुधवारी समन्स बजावले. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रक्षोभक वक्तव्ये करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भिन्न समुदायांत विद्वेष निर्माण करत असल्याचा दोन्ही भगिनींवर आरोप आहे.

यातच आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस विरोधात  कंगना राणावत  अशी परिस्थिती येणाऱ्या काळात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , अंधेरी कोर्टात अभिनेत्रीविरोधात वकील अली कासिफ खान देशमुख यांनी देशद्रोह आणि तिच्या ट्वीट्समधून धार्मिक समुहांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ही बॉलिवूड अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदा आणि अधिकृत सरकारी संस्था यांचा आदर करत नाही आणि तिने न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे.

दोन दिवसांपूर्वी कंगना राणावत ट्विट करत मुंबई पोलीस आणि  न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे. ‘किती पछाडलेली आहे ही पेंग्विन सेना. महाराष्ट्राचे पप्पूप्रो. फार आठवण येते क-क-क-क कंगना, काही हरकत नाही. लवकरच येईन’.  असं म्हणत तिने ट्विट केले होते.

दरम्यन, मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस सरसावले आहेत.

चौकशीसाठी त्या भगिनींना सोमवारी आणि मंगळवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कंगना आणि रंगोली यांनी मागील काही काळात बॉलीवूडसंदर्भात केलेले अनेक ट्‌विट वादग्रस्त ठरले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.