कंगना घेणार ट्विटरवरून एक्झिट; केले ‘हे’ मोठे विधान

मुंबई – बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या ट्विटरवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. शेतकरी आंदोलनावरून भारत सरकार ट्विटरवर चांगलाच वाद पेटला आहे. अशातच कंगनाने ट्विटरला बॅन करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

कंगना म्हणाली कि, आदरणीय पंतप्रधानजी, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती. ती चूक तुम्ही करू नका. त्या चुकीचे नाव होते ‘क्षमा’. ट्विटरने कितीही क्षमायाचना करू दे, तुम्ही क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्धाचा कट रचला, अशी तिने म्हंटले आहे. 

कू अॅपचे कौतुक करत कंगना म्हणाली कि, ट्विटर तुमची वेळ संपली आहे , आता कू अॅप वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. आपल्या देशाने बनवलेल्या कू अॅपचा वापर करण्यासाठी मी उत्साहित आहे. 

दरम्यान, कंगनाने जर शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या ट्विटबद्दल माफी मागितली नाही. तर ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग बंद पडण्याचा इशारा मध्यप्रदेश काँग्रेसने दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.