अलाहाबाद – देशातील सगळ्यांत मोठी आणि सुंदर फिल्म सिटी उभारण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
People’s perception that top film industry in India is Hindi film Industry is wrong. Telugu film industry has ascended itself to the top position and now catering films to pan India in multiple languages, many hindi films being shot in Ramoji Hydrabad 1/2 https://t.co/zB6wkJg1zX
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 19, 2020
या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.
कंगना रनौतने ट्वीट केलं आहे की, ‘लोकांचा असा समज आहे की, भारतात हिंदी फिल्म इंडस्ट्री सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. जो अत्यंत चुकीचा आहे. तेलगु फिल्म इंडस्ट्रीने सिद्ध केलं असून ती सध्या टॉपवर आहे. आणि तेलगु फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपट आता अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात येत आहेत. तसेच अनेक हिंदी चित्रपटांचं शुटींग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये केलं जातं.
कंगना पुढे म्हणाली, ‘योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणेचं मी समर्थन करते. आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक रिफॉर्म्सची गरज असते. सर्वात आधी आपल्याला एका मोठ्या फिल्म इंडस्ट्रीची गरज आहे. जी भारतातील चित्रपट उद्योग म्हणून ओळखली जाईल. हॉलिवूडलाही याचा फायदा मिळू शकेल. एक इंडस्ट्री परंतु, अनेक फिल्म सिटी.’
तत्पूर्वी, अधिकाऱ्यांशी बोलताना आदित्यनाथ म्हणाले होते की, सध्याच्या स्थितीत एका चांगल्या दर्जाच्या फिल्म सिटीची आवश्यकता असून उत्तर प्रदेश ती जबाबदारी उचलण्यास तयार आहे.
नोयडा, ग्रेटर नोयड अथवा यमुना एक्स्प्रेस वेच्या जवळपास जागा निवडावी फिल्म सिटी उभाण्याच्या संदर्भातला आराखडा तयार करावा असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.