कंगनाचा पुन्हा कांगावा ; ट्विटरद्वारे होणार अकाऊंटवर कारवाई

मुंबई –  अभिनेत्री  कंगना राणावत नेहमीच सोशलचा वापर करत देशातील अनेक मुद्यावर ट्विट करीत असते. तिच्या ट्विटमुळे नेहमीच सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण होतात. यामुळे ती नेहमीच चर्चत असते. ती ट्विटरच्या माध्यमांतून अनेकदा लोकांवर खोचक शब्दात टीका करीत असते.  मात्र कंगनाने केलेल्या ट्विटमुळे ती चांगलीच अडचणीत सापडली आहे. 

सध्या ट्विटरने आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावर शरसंधान साधलं आहे. यावर तिने पुन्हा ट्विट करत हल्लाबोल केला आहे. कंगनानं ट्विटरवर लिहिलं की, “ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे ‘तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल’” 

दरम्यान, कंगना राणावतच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. यामध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून आला. आता या बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून  येत्या  2 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित व्हायची शक्यता आहे.  

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.