नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणौतने एकापाठोपाठ ट्विट करत बाॅलिवूडवर हल्लाबोल केला आहे. बाॅलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि जिहादचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली आहे.
बाॅलिवूडमध्ये झालेली घाण साफ करण्याऐवजी बाॅलिवूड स्ट्राइक्स बॅकसारख्या
हॅशटॅगचा वापर केला जात आहे. मी म्हणते की, माझ्यावरही खटला दाखल करा.
जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत सगळ्यांचे पीतळ उघडं पाडीन असं कंगनाने
ट्विट करत म्हटले आहे.
कंगना दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाली की, मोठमोठे स्टार हे फक्त महिलांना
ऑब्जेक्टीफाय करत नसून तरूण मुलींचे शोषण देखील करतात. सुशातसिंह सारख्या तरूण अभिनेत्याला ते पुढे येऊ देत नाहीत. असे कंगनाने म्हटले आहे.
दरम्यान, कंगनाने सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीसांवरही टीका केली होती. तसेच मुंबईची तुलना पीओकेशी केली होती.