कंगणा रणावतच्या घरी लवकरच शहनाईचे सूर ऐकू येणार आहेत. तिच्या घरी एका साखरपुड्याचा समारंभ आयोजित केला गेला होता. त्यामध्ये कंगणा स्वतः, तिची बहिण रंगोली आणि कुटुंबातील अन्य सदस्यही सहभागी झाले होते. या सगळ्या रणावत कुटुंबाने या समारंभामध्ये खूप धमाल केली.
हा साखरपुडा नक्की होता तरी कोणाचा, असा प्रश्न वाचकांना पडला असेल. हा साखरपुडा कंगणा किंवा रंगोली या दोघींचाही नव्हता. तर कंगणाचा भाऊ अक्षत रणावतचा होता.
या साखरपुड्याच्यावेळी कंगणा गोल्डन साडीमध्ये पब्लिकचे लक्ष वेधून घेत होती. तिने आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांबरोबर साखरपुड्याचा आनंद मनसोक्त एन्जॉय केला. शॅम्पेनची बाटली ओपन करता करता कंगणाने एक फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला आहे.
सध्या कंगणा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकच्या कामामध्ये बिझी आहे. तिच्याबरोबर तिची बहिण रंगोली ही देखील या सिनेमामध्ये खास रोलमध्ये दिसणार आहे. रंगोली आतापर्यंत पडद्यावर फार ऍक्टिव्ह राहिलेली नाही.
मात्र कंगणाच्या आग्रहाखातर तिने हा रोल स्वीकारला आहे. कंगणाशी संबंधित सर्व संघर्षाच्या क्षणी रंगोलीचा सहभाग महत्वाचा राहिलेला असतो.