कंगनाची पॅशन

अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या “थलाइवी’ या आगामी चित्रपटासाठी जोरदार तयारी करत आहे. यासाठी तिने आपले मनालीमधील घरच स्टुडिओ बनवले आहे. या चित्रपटामध्ये कंगना तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता यांची व्यक्‍तिरेखा साकारणार आहे.

खरे पाहता ही भूमिका अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. विशेष म्हणजे या व्यक्‍तिरेखेसाठी नृत्यकला अवगत करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळेच कंगनाने सध्या डान्स शिकण्यावर आपला फोकस वळवला आहे. तिने भरतनाट्यमचा क्‍लासही लावला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने मनालीतील आपल्या घरी कुटुंबीयांसोबत सुट्टी एंजॉय केली; पण याचा परिणाम तिने कामावर होऊ दिला नाही. यादरम्यान तिने घरातच सर्व व्यवस्था करून भरतनाट्यमचा क्‍लास सुरू ठेवला.

मध्यंतरी, भरतनाट्यमच्या स्टेप्स शिकतानाचे व्हिडीओही कंगनाने सोशल मीडियावर अपलोड केले होते. आताही तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून यावरून ती नृत्य शिकण्यासाठी कोरियोग्राफरसोबत किती मेहनत घेत आहे हे लक्षात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.