कंगना राणावतला ‘ट्विटर’पाठोपाठ ‘इन्स्टाग्राम’चा दणका; केली कारवाई

मुंबई –   बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे. अशाच एका वादग्रस्त पोस्टमुळं कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद  केले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. त्यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली. मात्र एका पोस्टमुळं इन्स्टाग्रामने देखील कंगनाच्या पोस्टवर कारवाई केली आहे.

कंगनाला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाला आहे. याबद्दलची माहिती तिनं इन्स्टाग्रामवर दिली होती त्यात तिनं करोनाला एक सर्वसाधारण फ्लू असं म्हटलं होतं. आता कंगनानं दिलेल्या माहितीनुसार तिची पोस्ट इंस्टाग्रामनं हटवली आहे.

यावर कंगनानं म्हटलं की, ‘इंस्टाग्रामनं माझी पोस्ट हटवली आहे, ज्यात मी अशी धमकी दिली होती की मी करोनाला संपवणार आहे. मी ट्विटरवर अतिरेकी आणि कम्युनिस्टांची सहानुभूती ऐकली होती मात्र कोरोना फॅन क्लब. मस्तच. मला इन्स्टाग्रामवर येऊन दोन दिवस झाले आहेत, असं दिसतंय की मी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ इथे टिकू शकणार नाही.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.