मुंबई – अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने मुंबईत एक आलिशान घर बनवलं आहे. महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. नवाझुद्दीनच्या मुंबईतील या घराचे काम पूर्ण झाले आहे.
घर खुपच सुंदर आणि आलिशान असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून देण्यात आल्या आहेत. चित्रपटसृष्टीत कामं मिळवण्यासाठी आणि स्थिरावण्यासाठी नवाझुद्दीनला खूप स्ट्रगल करावं लागलं. परंतु, टॅलेंटच्या जोरावर त्यानं यश मिळवलं. सध्या नवाझ एक यशस्वी अभिनेता असून, संपूर्ण जगभरात त्याचे लाखो फॅन्स आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, नवाझुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याचे फोटो पाहून बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणजेच, अभिनेत्री कंगना राणावत हिने आपली प्रतिक्रिया देत विशेष कौतुक केलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. यात कंगना लिहिते की… ‘नवाझुद्दीन सिद्दीकी सरांनी त्यांच्या नव्या घराचं डिझाईन स्वतः केलं आहे. ते खूपच सुंदर आहे. खूप…खूप… शुभेच्छा.!’ असं ती म्हणाली.
नवाझुद्दीनने या घराचे काम करवून घेताना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घर तयार करवून घेतले आहे. विशेष म्हणजे या घराचे नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत ‘नवाब’ असे ठेवले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या आलिशान घराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.