Kangana Ranaut’s New Restaurant | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या अभियनाद्वारे इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय, तिने राजकारणातही प्रवेश केला आहे. आता कंगनाने नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे. कंगनाने हिमाचलच्या टेकड्यांमध्ये नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.
कंगनाने तिच्या या रेस्टोरंटला ‘द माउंटन स्टोरी’ असे हटके नाव दिले आहे. या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची चव चाखता येणार आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात असलेल्या या रेस्टोरंटमध्ये ग्राहकांना स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
View this post on Instagram
द माउंटन स्टोरी. ओपनिंग नाईट. एक स्वप्न साकार झाले. ज्यांनी मला हे साध्य करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. नक्की भेट द्या, असे कॅप्शन देत कंगनाने रेस्टोरंटमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने हे हॉटेल ग्राहकांसाठी सुरू झाले आहे.
View this post on Instagram
हे रेस्टोरंट सुरू करण्याबाबत कंगनाने सांगितले होते की, तिचे लहानपणापासूनच रेस्टॉरंट सुरू करण्याचे स्वप्न होते. अन्नाच्या माध्यमातून माणूस लोकांशी जोडला जातो. तेही एक प्रकारचे प्रेमच असते. रेस्टॉरंट सुरू करणे वाईट नाही, पण कधी कधी त्याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहणे चुकीचे ठरते.
कंगनाच्या रेस्टोरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सिड्डू, स्टफ्ड तंदूरी आलू पराठा, आलू पुरी, पोहे, वडापाव, पकोडा, भजी, स्ट्रीट स्टाइल नूडल्स, मूग डाळ विथ राईस, माह की दाल, दम मद्रा, कद्दू का खट्टा, कढी पकोडा, मटर पनीर, लच्छा पराठा, बटर नान आणि बदना गोड यासह अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येईल.