मुंबई – बॉलिवूल अभिनेत्री कंगणा रणौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात कंगणाने नुकताच एक फोटा आपल्या इंस्टावर शेअर केला आहे. या चित्रपटात कंगणा भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारणार असून तिने वायुसेनेच्या वर्दीमधला फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CS0iwXLChid/?utm_source=ig_web_copy_link
विकी कौशलच्या प्रसिद्ध ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे निर्माते सर्वेश मेवारा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे शुटिंग सुरु करण्यात आले असल्याकारणाने कंगणाने एक फोटो शेअर केला आहे. वायूदलातील पायलटची भूमिका ती साकारणार असून प्रथमच तिने वायुसेनेच्या वर्दीमधला फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, फोटो शेअर करताना कंगणाने त्या फोटोला मी माझ्या पुढच्या मिशनवर…आज पासून होणार आहे सुरुवात, हृदयात जोश वाढत आहे त्याचे कारण माझी टीम. असे कॅप्शन तिने त्या फोटोला दिले आहे.