मुंबई – मोदी सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खलिस्तानी चळवळीशी तुलना केली होती. त्यानंतर देशाच्या विविध भागात कंगनाच्या विरोधोत अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
अलिकडेच शीख समुदायाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी कंगनावर एफआयआर दाखल केल आहे. त्यानंतर आज कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये आजही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामुळे काही फरक पडत नाही. असे तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहले आहे. सोबत एक वाइन पीत असतानाचा बोल्ड फोटो सुद्दा कंगनाने ठेवला आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हातात वाईनचा ग्लास घेतलेला दिसत आहे. यासोबत कंगनाने त्या फोटोवर लिहिले आहे की, आणखी एक दिवस, आणखी एक एफआयआर…ते मला अटक करायला आले तर…माझा मूड सध्या घरी असाच आहे. फोटोमध्ये कंगना कूल दिसत आहे.
काय म्हणाली होती कंगना?
“खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही.”