मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचे सस्पेंड केलेले ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. कंगनाने शेअर केलेल्या ट्विटमध्ये आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले की, ‘मी परतल्यानंतर खूप आनंदी आहे. कंगनाचे ट्विटर अकाऊंट तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सस्पेंड करण्यात आले होते. जेव्हा इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतला तेव्हा कंगनाने आपले खाते पुनर्संचयित होईल अशी आशा व्यक्त केली होती.
Hello everyone, it’s nice to be back here 🙂
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 24, 2023
ट्विटर का निलंबित करण्यात आले?
मे २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. बंगाल निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात तिने वादग्रस्त ट्विट केले होते. यानंतर अभिनेत्रीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले.
याशिवाय कंगनावर ट्विटरची पॉलिसी मोडल्याचा आरोपही करण्यात आला होता. तिने केलेले अपमानास्पद ट्विट ट्विटरच्या धोरणाला हानी पोहोचवत आहेत. ज्यावरून कंगनाचे खाते सस्पेंड करण्यात आले होते.