मुंबई – बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांत ती वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आहे. अशातच तीने आज आणखी एक ट्विट करून बाॅलिवूडमधील इतर अभिनेत्रींना डिवचले आले. कंगनाने तिची तुलना हाॅलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत केली आहे.
Massive transformation alert, The kind of range I display as a performer no other actress on this globe has that right now, I have raw talent like Meryl Streep for layered character depictions but I can also do skilled action and glamour like Gal Gadot #Thalaivi #Dhaakad pic.twitter.com/fnW3D20o6K
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) February 9, 2021
संपूर्ण जगात अन्य कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखी नसल्याचा दावा कंगनाने केलाय. कंगनाने म्हटलेय की, तिच्यासारखे ग्लॅमर आणि अॅक्शन फक्त माझ्याकडेच आहे. आणि असे जर दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला वाटत असेल की, आमच्यासारखे ग्लॅमर आणि अॅक्शन त्यांच्याकडे आहे. त्यांना मी आव्हान करते की, त्यांनी पुढे येऊन ते सिद्ध करावे. त्यांनी ते सिद्ध केले तर मी उद्धटपणा सोडायला तयार आहे. आता हे पाहणे महत्वाचे आहे की, कंगनाच्या या ट्विटला दुसऱ्या अभिनेत्री कशा प्रकारे उत्तर देतात.
https://twitter.com/KanganaTeam/status/1359028812198129664
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर कंगनाने टीका केली होती. आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा असे ती म्हणाली होती. एवढेच नाही तर एका ट्विटमध्ये कंगनाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी देखील म्हटले होते. तिच्या याच ट्विटविरोधात आता तक्रार देण्यात आली असून यामुले तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.