कंगणाचे मणिकर्णिकासाठी शंकराला साकडे

कंगना रणावत आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमधील एक सफल अभिनेत्री बनली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तिच्या वाट्याला बॉक्‍स ऑफिसचे यश आलेले नाही.

कंगणाच्या “मणिकर्णिका’ला याच वर्षी रिलीज करायचे होते. मात्र व्हीएफएक्‍स इफेक्‍टच्या कामासाठी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली गेली. आता पुढच्यावर्षी 26 जानेवारीच्या सुमारास झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित हा सिनेमा रिलीज होणार आहे. हृतिकच्या “सुपर 30′ शी “मणिकर्णिका’ची स्पर्धा होणार असल्याने कंगणाला थोडे टेन्शन आलेले असणे स्वाभाविकच आहे. हृतिकचा सिनेमा वास्तवदर्शी असेल, तर कंगणाचा सिनेमा ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर असेल. पण तरिही व्यवसायिक यशाच्या दृष्टीने कंगणासाठी हा सिनेमा हिट होणे अगदी महत्वाचे आहे. याच दुष्टचक्रातून सुटण्यासाठी कंगणाने आता भगवान शंकराला साकडे घातले आहे. कोईम्बतूरपासून 30 किलोमीटर अंतरावरील ध्यानलिंग आदिशक्ती आश्रमामध्ये जाऊन तिने शंकराला अभिषेक घातला आहे. या अभिषेकाच्या वेळचे कंगणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. जरीची साडी नेसलेली कंगणा भक्तीभावाने शिवलिंगाला अभिषेक घालताना दिसते आहे. तिने आताच हा अभिषेक करण्यामागेही एक कारण आहे. येत्या 15 ऑगस्टच्या सुमारास “मणिकर्णिका’चा टीजर रिलीज होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा “गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा “सत्यमेव जयते’देखील रिलीज होणार आहे. टीजर हिट झाला तर सिनेमाचे निम्मे यश निश्‍चित असते. म्हणून टीजर रिलीज होण्यापूर्वीच तिने शंकराला अभिषेक केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंगणाने पूर्वी म्हटल्याप्रमाणे तिला जरा हटके रोल करण्यात सध्या जास्त इंटरेस्ट आहे. त्याशिवाय आपली वेगळी दखल घेतली जाणार नाही, असे तिचे मत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईचा रोल असाच एकदम हटके असणार आहे. त्यात कंगणाने युद्धाचे प्रसंग स्वतःच केले आहेत. त्यासाठी तिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीही शिकली आहे.

कंगणाने “मणिकर्णिका’चे शुटिंग संपवून तिने लंडनला राजकुमार रावबरोबर “मेंटल है क्‍या’चे एक शेड्युलही पूर्ण केले आहे. यापूर्वी तिने राजकुमार राव बरोबर “क्‍वीन’ केला होता. त्याच रोलसाठी कंगनाला “बेस्ट अॅॅक्‍ट्रेस’चा अॅॅवॉर्डही मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)