मुंबई – बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या ट्विटरवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिच्या ट्विटमुळे सोशलवर कंगना सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अशातच तीने आणखी एक ट्विट करून बाॅलिवूडमधील इतर अभिनेत्रींना डिवचले आले. कंगनाने तिची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींशी केली. यामुळे सध्या सोशलवर नव्या वादंग होण्याची शक्यता आहे.
I was stuck in edgy/neurotic roles, this film changed the trajectory of my career, was my entry in to mainstream that too with comedy, with Queen and Datto I strengthened my comic timing and became the only actress after legendary SriDevi ji to do comedy #10yearsoftanuwedsmanu https://t.co/WMXgPdi781
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 25, 2021
तिने ट्विट केले आहे की,’तनू वेड्स मनू चित्रपटाने माझ्या करिअर वेगळी दिशा दिलीय . या चित्रपटातील माझी भूमिका विनोदी असून ती प्रेक्षकांना फार आवडली. या पूर्वीच्या चित्रपटामध्ये मी ठोकळेबाज भूमिकांमध्ये अडकून पडले होते. मात्र तनू वेड्स मनू पासून सुरू झालेला विनोदी भूमिकांचा प्रवास क्वीनमुळे अधिकच बहरला. श्रीदेवीनंतर विनोदी भूमिका सातत्याने साकारणारी मी बॉलीवूड मधली केवळ दुसरी अभिनेत्री आहे! असं म्हणत तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींशी कंगनाने स्वःताची तुलना केली.
तत्पूर्वी,कंगनाने तिची तुलना हाॅलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत केली होती. संपूर्ण जगात अन्य कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखी नसल्याचा दावा कंगनाने होता. तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास , कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे.