Kangana Ranaut | Emergency : अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणावतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात कंगणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 6 सप्टेंबरला ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आणखीच पुढे जाण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी प्रलंबित आहे. अशा स्थितीत कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून चांगलाच दणका बसला आहे. चित्रपटाला सेंसर सर्टिफिकेट मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज करता यावा, यासाठी हे पाऊल उचललं होतं. पण मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाला सीबीएफसी सर्टिफिकेट देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. या प्रकरणी इतक्या लवकर आदेश देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलय.
या प्रकरणी 18 सप्टेंबरपर्यंत निर्णय होईल. म्हणजे 19 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी होईल. त्याशिवाय CBFC ला सुद्धा कोर्टाने फटकारलय. चित्रपटांवर कोट्यवधी रुपये लागलेले असतात. गणपती उत्सवाच्या सुट्टीच कारण देऊन सर्टिफिकेट संबंधीच्या विषयावरुन CBFC ला पळ काढता येणार नाही असं कोर्टाने म्हटलय. याचा अर्थ कंगनाचा हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कायदेशीर समस्यांमुळे तो चित्रपटगृहात येऊ शकणार नाही.
निर्मात्यांनी कोर्टात काय म्हणाले
‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या वतीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड न्यायालयात हजर होते. सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाचे प्रमाणपत्र रोखण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. सुरुवातीला तो सर्टिफिकेट द्यायला तयार होता पण जेव्हा प्रोडक्शन हाऊस ते घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने नकार दिला.
काय आहे सेन्सॉर बोर्डाचा युक्तिवाद?
सेन्सॉर बोर्डाच्या वतीने खटला लढणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी खासदार उच्च न्यायालयासमोर केलेला युक्तिवादही चुकीचा असल्याचे मत मांडले. या गोष्टी स्पष्ट होताच तो चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर सही करून ते प्रदर्शित करेल.
चित्रपटाविषयी थोडक्यात
कंगनाने ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. दिवंगत सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. कंगनाने हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे.