मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या लग्नाच्या चर्चेने अलिकडेच जोर धरला आहे. अशातच अभिनेत्री भर पार्टीत एका व्यक्तीला किस करताना दिसून आली आहे. कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री कंगना सध्या तिच्या येणाऱ्या चित्रटांमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीकडे अनेक चित्रपट आहेत तसेच कंगना तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच कंगना पहिल्यांदाच OTT रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ होस्ट करताना दिसली. कंगनाचा हा शो सुपरहिट ठरला. आता कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये कंगना एका व्यक्तीला सारखं किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून केवळ चाहतेच आश्चर्यचकित झाले नाहीत तर ज्या व्यक्तीवर कंगना प्रेमाचा वर्षाव करत आहे आणि ज्या व्यक्तीला ती किस करत आहे ती व्यक्तीही हैराण झालेली दिसते. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून शिवम सिंह आहे, जो लॉक अपचा स्पर्धक होता. कंगन आणि शिवमची ही बाँडिंग नेटकऱ्यांना खूप आवडली आहे आणि आता दोघांचा हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.