मुंबई – चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझवर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मिम्सचा संदर्भघेत दिलजीत दोसांझची खिल्ली उडवली आणि अटक करण्याची धमकीही दिली.
#JustSaying @diljitdosanjh https://t.co/SPMYWVjnfO
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 21, 2023
कंगनाने ट्विटरवर स्विगी इंस्टाग्राममार्टची एक पोस्ट शेअर केली, ‘ज्यामध्ये विविध प्रकारच्या डाळींचे फोटो दिसत होते आणि त्यासोबत लिहिले होते, “ओय पल्स आ गई पल्स.” कंगनाने या पोस्टवर दिलजीतला टॅग केले आणि लिहिले, “फक्त सांगत आहे.”
तसेच इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने लिहिले, “ज्यांनी खलिस्तानींना पाठिंबा दिला ते लक्षात ठेवा, पुढचा नंबर तुमचा आहे. पोलीस आले आहेत. ही वेळ नाही ती नाही जेव्हा कोणी काहीही करायचे. देशाशी गद्दारी करण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करणे महागात पडेल.
दरम्यान, पंजाबमध्ये सध्या पोलीस वारिस पंजाब दे ग्रुपवर जोरदार कारवाई करत आहेत. अनेकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलीस कारवाईच्या सुरुवातीपासून अमृतपाल सिंग बेपत्ता आहे. अशात या घटनेचा संदर्भ घेत कंगनाने गायक दिलजीत दोसांझवर टीका केली आहे. आता या टीकेला दिलजीत दोसांझ काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.