मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कंगना तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना कोणत्याही मुद्द्यावर आपले मत बिंदासपणे मांडते, ज्यामुळे ती अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर येते.
These are western clothes, invented and promoted by white people, I was once at the Vatican wearing shorts and t shirt, I wasn’t even allowed in the premises, I had to go back to my hotel and change…. These clowns who wear night dresses like they are casuals are nothing but lazy… https://t.co/EtPssi3ZZj
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 26, 2023
यावेळी कंगनाने ट्विटरवर शॉर्ट्स घालून मंदिरात गेलेल्या मुलीला फटकारले आहे. इतकेच नाही तर कंगनाने तिचा स्वतःचा एक किस्साही शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, तिलाही शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.
एका यूजरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये मुली शॉर्ट्समध्ये हिमाचलमधील बैजनाथ शिव मंदिरात जात आहेत. युजरने ट्विट केले,’हे हिमाचलमधील प्रसिद्ध शिव मंदिर बैजनाथचे दृश्य आहे. एखाद्या पब किंवा नाईट क्लबमध्ये गेल्याप्रमाणे बैजनाथ मंदिरात पोहोचलो. अशा लोकांना मंदिरात प्रवेश देऊ नये. याला माझा तीव्र विरोध आहे. हे सर्व बघून माझी विचारसरणी लहान किंवा गरीब म्हटले तर तेही मान्य आहे.’
या ट्विटला रिट्विट करत कंगनाने लिहिले,’हे वेस्टर्न कपडे आहेत, जे ब्रिटिशांनी बनवले आणि प्रमोट केले. एकदा मी व्हॅटिकनमध्ये होते आणि मी शॉर्ट्स, टी-शर्ट घातले होते. मला कॅम्पसमध्येही प्रवेश दिला गेला नव्हता. मला हॉटेलमध्ये जाऊन कपडे चेंज करावे लागले. ‘ असं म्हणत तिने आपला अनुभवहि शेअर केला आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच कंगना दिग्दर्शनही करत आहे.