कंगना ईमेल प्रकरण: उद्या होणार मुंबई पोलिसांकडून हृतिकची चौकशी, वाचा सविस्तर बातमी…

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने गतवर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. तसेच कंगनाने हृतिक आणि आपल्यामध्ये काही ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे देखील सांगितले. त्यावेळी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर कंगनाने हृतिकवर आरोप लावल्याने बॉलिवूडमध्ये मोठे वादंग देखील उठले होते.

दरम्यान, आता याच प्रकरणावरून अभिनेता हृतिक रोशनला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स पाठवले आहेत. मुंबई पोलिसांनी हृतिकला उद्या (२७ फेब्रुवारी) जबाब नोंदवण्यासाठी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर (सीआययू) हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात ही चौकशी केली जाणार आहे.

हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात क्रिश सिनेमाच्या दरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र पुढे या दोघांचं अफेयर आणि ब्रेक अप दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर बरीच चिखलफेकही केली होती. दरम्यान, कंगना गेल्या महिन्या भरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगची शिकार होत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.