मुंबई – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणौतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी एक गाणं तयार केलं. यामुळे भडकलेल्या कंगनाने दिलजीतला खलिस्तानी संबोधले. कंगना सुरुवातीपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेत आहे.
Isko bhi apne 2 rupees banane hain, yeh sab kabse plan ho raha hai ?One month toh minimum lagega to prep for video and announcement, and libru want us to believe it’s all organic ha ha #Indiatogether #IndiaAgainstPropoganda https://t.co/WvxxRr4T1F
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 3, 2021
दरम्यान दिलजीत दोसांझने RiRi हे गाणे रिहानाला समर्पित केले आहे. त्यावरुन कंगना दिलजीतवर भडकली.ट्विट करून म्हणाली, “याला पण आपले दोन रुपये बनवायचे आहेत, याची प्लानिंग कधीपासून सुरु होती? व्हिडिओ बनवायला आणि नंतर घोषणा करायला, कमीत कमी एक महिना तर लागेल आणि हे सर्व ऑर्गेनिक आहे, यावर आपण विश्वास ठेवावा, अशी त्यांची इच्छा आहे” असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
Mera ek he kaam jai Desh Bhakti … wahi karti hoon sara din.. main toh wahi karungi lekin tera kaam tujhe nahin karne dungi Khalistani… https://t.co/NsU5DzXCiG
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 3, 2021
कंगनाच्या ट्विटला प्रत्युत्तर देत दिलजीत म्हणाला की, मला माझे काम शिकवू नको. मी अर्ध्या तासात गाणे बनवू शकतो. तुझ्यावर गाण बनवण्याची माझी इच्छा नाही. पण त्यासाठी मला दोन मिनिटं लागतील. मला त्रास देऊ नको, तू जाऊन तुझं काम कर.
Mera ek he kaam jai Desh Bhakti … wahi karti hoon sara din.. main toh wahi karungi lekin tera kaam tujhe nahin karne dungi Khalistani… https://t.co/NsU5DzXCiG
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 3, 2021
यावर कंगना पुन्हा आक्रमक झाली. मी देशभक्त असून दिलजीतला त्याच्या योजनेत यशस्वी होऊ देणार नाही. माझ एकच काम आहे देशभक्ती. तेच मी दिवसभर करत असते. मी तेच करत राहणार. पण खलिस्तानी तुला तुझं काम करु देणार नाही” असे कंगनाने म्हटले आहे.