Kane Richardson Retirement : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने (Kane Richardson Retirement) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 34 वर्षीय रिचर्डसन हा 2021मध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. त्याने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते आणि २०२२ च्या वर्ल्डकपमध्येही खेळला होता. रिचर्डसनने (Kane Richardson Retirement) आपली निवृत्ती इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून जाहीर केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनद्वारे अधिकृत निवेदन जारी केले. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले कि,“मी २००९ मध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हापासून ते आतापर्यंत मी या खेळासाठी सर्वकाही केलं आहे. आता माझ्या आयुष्यातील इतक्या सुंदर प्रवासाचा समारोप करण्याची हीच योग्य वेळ आहे.” शरीर साथ देत नसल्याने आणि या वयात वेगवान गोलंदाजी करणे कठीण झाल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. Kane Richardson Retirement आंतरराष्ट्रीय कारकीर्द केन रिचर्डसनने ऑस्ट्रेलियासाठी २५ वनडे आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. वनडेमध्ये त्याने ३९ विकेट्स घेतल्या (सरासरी ३१.७९), तर टी-२० मध्ये ४५ विकेट्स (सरासरी २३.५३) मिळवल्या. २०१६ मध्ये भारताविरुद्ध कॅनबेरात त्याने ५ विकेट्स घेत प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता. मात्र, त्याला नियमित संधी मिळाली नाही आणि त्याची कारकीर्द मुख्यतः देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटवर केंद्रित राहिली. बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी रिचर्डसनची खरी ओळख बिग बॅश लीग (BBL) मध्ये आहे. या स्पर्धेत त्याने ११८ सामने खेळत १४२ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तो BBL च्या इतिहासातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे (इकॉनॉमी ७.८७, सरासरी २३.२१). त्याने पहिल्या सहा हंगामांत ॲडिलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना क्लबसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. नंतर मेलबर्न रेनेगेड्सकडून २०१८-१९ मध्ये ट्रॉफी जिंकली आणि सध्याच्या २०२५-२६ हंगामात सिडनी सिक्सर्सकडून एक वर्षाचा करार केला होता. मात्र, फक्त दोन सामन्यांनंतरच त्याने निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेट कारकीर्दीचा प्रवास रिचर्डसनने २००८-०९ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१३ मध्ये श्रीलंकेसविरुद्ध वनडे पदार्पण केले आणि २०१४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी-२० पदार्पण. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो सक्रिय होता, ज्यात ३४ प्रथम श्रेणी सामने आणि १०२ विकेट्सचा समावेश आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या पार्श्वभूमीवर रिचर्डसनची निवृत्ती ऑस्ट्रेलियासाठी भावनिक ठरली आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीने आणि BBL मधील योगदानाने क्रिकेटप्रेमींना अनेक रोमांचक क्षण दिले.