कांचन कुल यांचा नांदुर सहजपुर गावभेट दौरा

नांदुर – दौंड तालुक्यात महायुतीच्या वतीने आमदार राहुल कुल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी गावभेटीसाठी नांदुर या गावामध्ये ढोल ताशाच्या गजरात, बाईक रॅली काढली. या रॅलीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. बाईक रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

यावेळी कांचन कुल यांनी गावातील वडिलधाऱ्या लोकांची आणि आमदार राहुल कुल यांच्या आरोग्य निधीतून मोफत उपचार मिळालेल्या लोकांची विचारपूस केली. विचारपूस करत असताना ज्या लोकांचे मोठे ऑपरेशन मोफत झाले, ते नागरिक म्हणाले की आम्ही आयुष्यभर कुल कुटुंबियांच्या पाठीमागे उभे राहू आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊ. यावेळी कांचन कुल म्हणाल्या की राहुल कुल नेहमीच आपल्या बरोबर असतील. त्यांनी तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

यापुढे कोणालाही आरोग्याची मदत कमी पडून देणार नाही असे कांचन कुल म्हणाल्या. या वेळी गावचे उपसरपंच कैलास गायकवाड, माजी सरपंच पोपटराव बोराटे,अतुल बोराटे,निखिल बोराटे,संजय थोरात,पै अक्षय थोरात,विशाल घुले,पिंटु गुरव,आमर बोराटे,आदी ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.