कोडोलीतून चोरट्यांनी टेम्पोच पळवला

सातारा  – कोडोली, सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी उभा केलेला टेम्पोच पळवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चालक गणेश पवार (रा. मोहिते कॉलनी, कोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात चोरीची तक्रार दिली आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेश पवार यांनी ते कामाला असलेला टेम्पो गणेश चौक कोडोली येथे दि.24 रोजी उभा केला होता. त्यानंतर ते घरी गले होते व दि.25 रोजी त्यांच्या लक्षात चोरीचा प्रयत्न आला. दि.24 ते 25 मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रस्त्याकडेला उभा केलेला टोम्पो व त्यात असलेले टायर, स्टेपनी असा सुमारे पाच लाख रुपयांची चोरी केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.