कांबळे यांची सीट पक्‍की – खासदार गिरीश बापट

पुणे कॅन्टोन्मेंट – महायुती हे एक मोठे कुटुंब असून या निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपले कर्तव्य चोख बजावतील, त्यामुळे कांबळे यांची विधानसभेतील सीट पक्की आहे, असा विश्‍वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

महायुतीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा कॅम्प परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. तसेच निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहनही यावेळी बापट यांनी केले.

माजी मंत्री दिलीप कांबळे, महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे, सदानंद शेट्टी, गणेश बीडकर, उत्तरप्रदेशातील आमदार रवि सतिजा, शिवसेनेचे संजय मोरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, अभय वाघमारे, शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या नगरसेविका मनिषा लडकत, प्रियांका श्रीगिरी, किरण मंत्री, अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, ंतोष इंदूरकर, संदीप लडकत, मुकुंदराव गायकवाड, अशोक शिरोळे, बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, महिपाल वाघमारे, शैलेंद्र चव्हाण, उत्तम भुजबळ आदी उपस्थित होते.

रवि सतिजा यांची फटकेबाजी…
आमदार रवी सतिजा यांनी या मेळाव्यात व्यासपीठावरून जोरदार भाषण केले. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीतील अनेक उदाहरणे देत त्यांनी विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या हिंदीतील भाषणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.